Showing posts with label मराठी कविता. Show all posts
Showing posts with label मराठी कविता. Show all posts

Tuesday, August 08, 2017

विसरून जातो भान माझें मी

पाहताना तुझ्या त्या ..
ढळणाऱ्या केसांची लट!!
कसं सांगू तुला ..
विसरून जातो भान माझें मी सरसकट !!

केसांची लट
 

Tuesday, July 25, 2017

समजेल का तुला कधी

समजेल का तुला कधी ...
हूर हूर ह्या माझ्या मनातली !!
होशील का तू जीवनसाथी ...
ह्या सारीपाटाच्या खेळातली !!
 
 
जीवनसाथी
 

Tuesday, May 23, 2017

खूपच आवडेल मला

खूपच आवडेल मला..
जोडताना नांव तुझ्या नांवाला !!
जर देशील तू आज साथ मला ..
मग ह्या जगाची पर्वा कश्याला !!

आवडेल मला
 

Wednesday, May 17, 2017

तुझ्या होटांची लाली

तुझ्या होटांची लाली आज काही ...
जास्तच भडक होती !!
कसं सांगू तुला?
काही केल्या माझी नजरच ..
तेथून हटत नव्हती !!

तुझ्या होटांची लाली
 

Thursday, May 11, 2017

केसांची लट जेंव्हा

केसांची लट जेंव्हा...
तुझ्या गालावर रुळते!!
ते पाहताना मग अपसूकच...
ओळीला ओळ जुळते!!

केसांची लट जेंव्हा

Friday, May 05, 2017

किती वाट पाहावी

किती वाट पाहावी....
तुझ्या येण्याची !!
जसी धरणीनं ....
पावसाची !! 

किती वाट पाहावी
 

Thursday, May 04, 2017

रात्रंदिवस तुझ्यासाठी झुरणं

समजेल का तुला माझं हे...
रात्रंदिवस तुझ्यासाठी झुरणं !!
जसं चकोराचं पौर्णिमेच्या चंद्राची...
वाट पाहणं !!

तुझ्यासाठी झुरणं
 

Tuesday, April 25, 2017

मणी एकच आस असावी जिंकण्याची

प्रत्येकाचं आपलं आपलं ...
नशीब असतं !!
काही फुलं देवाच्या पायावर ...
वाहिली जातात !!
तर काही केसांच्या ...
वेणीत माळली जातात !!
खंत नसावी ह्या ....
दुज्याभावाची !!
बस मणी एकच आस असावी ...
जिंकण्याची !!

जिंकण्याची

Monday, April 24, 2017

आज वाहतो शब्दफुले ही

आज वाहतो शब्दफुले ही...
तुझ्या चरणी!!
सदा राहूदे नाम तुझे रे…
माझ्या ध्यानी मणी!!
विठ्ठला ही भाभडी भक्ती पामराची…
घ्यावी गोड माणोनी!!

आज वाहतो शब्दफुले ही

Thursday, April 20, 2017

आठवणीत तुझ्या रमताना

आठवणीत तुझ्या रमताना..
वेळ कधी निघून जातो समजतच नाही!!
सांगना साजणी मला..
तुझ्याकडेही होतं का? असं काही!!

आठवणीत तुझ्या रमताना


Wednesday, April 19, 2017

सांग सखे समजेल का तुला


सांग सखे समजेल का तुला..
ही ओढ माझ्या मनाची!!
जसी प्रियेच्या प्रतीक्षेत..
घुटरघू करणाऱ्या पारव्याची!!

सांग सखे समजेल का तुला

Tuesday, April 18, 2017

गर्व कशाचा करशी माणसा

पूर्वेला उगवलेला तर... 
पश्चिमेला मावळणारच आहे!!
गर्व कशाचा करशी माणसा...
शेवटी खाली हातच जाण आहे!!

गर्व कशाचा करशी माणसा

तुझं ते लाजून खाली पाहणं

आठवतं आजून मला...
तुझं ते लाजून खाली पाहणं!!
जसं पौर्णिमेच्या चंद्राच ...
ढगामागे जाणं!!

आठवतं आजून मला

Monday, April 17, 2017

तुझ्यावाचून सर्व काही सुनंसुनं आहे

तुझ्यावाचून सर्व काही सुनंसुनं आहे...
ह्या अनोळखी गर्दीमध्ये!!
तरीही रमलेला असतो मी...
तुझ्या आठवणींमध्ये !!


सर्व काही सुनंसुनं

पहिल्यांदाच जाणवलं मला

पहिल्यांदाच जाणवलं मला..
किती पोरकं आहे हे मन माझं वेडं!!
भरल्या गर्दीतही तुलाच का शोधतं..
आजपर्यंत सुटलच नाही हे कोडं!!

पहिल्यांदाच जाणवलं मला


फक्त माझ्यासाठीच असावं

ती
असं काही बोल की ते फक्त माझ्यासाठीच असावं!
तो
रोजची सकाळ व्हाव्ही तुझ्या बाहुपाशात!
आणि सकाळची न्याहरि तुझा प्रेमळ धाकात!
मग कामावर जाताना तो प्रेमळ निरोप हवासा वाटणारा!
आणि घरी आल्यावर तुझा सहवास तो मन फुलवणारा!
मग रात्री बनून जावं ब्रम्हर तुझ्या बाहुपाशात गुरफटणारा!


Saturday, April 15, 2017

तुझं ते नजरेनं बोलणं

समजलच नाही मला...
तुझं ते नजरेनं बोलणं!!
घेऊन येशील का अजून एकदा ...
तुझ्याबरोबरच ते स्वच्छंदी वावरणं!!

 

तुझं ते नजरेनं बोलणं

Thursday, April 13, 2017

सांगना त्या खटयाळ वाऱ्याला

सांगना त्या खटयाळ वाऱ्याला!
नको झोम्बस माझ्या केसाला!
पाहूदेणा माझ्या सख्याला!
केल्या अठ्ठासाला आणि क्षीणगाराला!

 

सांगना त्या खटयाळ वाऱ्याला

Wednesday, April 12, 2017

आभाळ आज भरून आलंय


आभाळ आज भरून आलंय काळ्यागर्द ढगांनी!
सांगना साजणी स्वप्नी येशीलका सोनपावलांनी!!

आभाळ आज

Tuesday, April 11, 2017

शब्दांना शब्द जोडताना एक ओळ बनावी

शब्दांना शब्द जोडताना एक ओळ बनावी!
त्या ओळींना ओळ जोडताना एक भावना जुळावी!
त्या भावनांना तुझ्या आठवणींची झालर असावी!
ती झालर माझ्या यशाच्या पताकेला जोडावी!
ती पताका रात्रंदिन चोफेर फडकत राहावी!
अखेर माझ्या जीवनाची ज्योत तुझ्या साथीनेच मालवावी!

 

एक ओळ बनावी