Showing posts with label भावना. Show all posts
Showing posts with label भावना. Show all posts

Tuesday, April 11, 2017

शब्दांना शब्द जोडताना एक ओळ बनावी

शब्दांना शब्द जोडताना एक ओळ बनावी!
त्या ओळींना ओळ जोडताना एक भावना जुळावी!
त्या भावनांना तुझ्या आठवणींची झालर असावी!
ती झालर माझ्या यशाच्या पताकेला जोडावी!
ती पताका रात्रंदिन चोफेर फडकत राहावी!
अखेर माझ्या जीवनाची ज्योत तुझ्या साथीनेच मालवावी!

 

एक ओळ बनावी